हैदराबाद : हैदराबादमध्ये झालेल्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार झाल्यानंतर पिडीतेच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
माझ्या मुलीचा मृत्यू होऊन 10 दिवसांचा काळ लोटला आहे. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी प्रतिक्रीया देत त्यांनी या एन्काउंटरबाबत तेलंगण सरकारचे अभिनंदन केले आहे.
My daughter’s soul at peace now: Hyderabad veterinarian’s father on encounter
Read @ANI story | https://t.co/pTLxgCcSV3 pic.twitter.com/SizszIrRw8
— ANI Digital (@ani_digital) December 6, 2019
हे चार आरोपी अशा प्रकारे एन्काउंटरमध्ये ठार झाल्याने हे एक उदाहरण म्हणून कायम राहील. अतिशय रेकॉर्ड वेळेत आम्हाला न्याय मिळाला आहे, असं पिडीतेच्या बहिणीने म्हटलं आहे.
दरम्यान, हैदराबादमधील प्रकरणात पीडितेच्या कुटूंबाला दहा दिवसांत न्याय मिळाला आहे. आमच्याप्रमाणे हैदराबादमधील पीडित कुटुंबाच्या वाट्याला संघर्ष आला नाही. या गोष्टीचं समाधान वाटत आहे, अशी प्रतिक्रीया निर्भयाच्या आईनं दिली.
महत्वाच्या घडामोडी –
हैदराबाद आरोपीं एन्काउंटरवर प्रकरणी ‘निर्भया’च्या आईची प्रतिक्रिया
ज्या ठिकाणी बलात्कर केला.. त्याच ठीकानी एन्काऊंटर झाला; हैदराबाद प्रकरणी आरोपींचा एन्काउंटर
मुख्यमंत्र्याना ‘हे’ खातं स्वत:कडे ठेवाण्याची इच्छा
“सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत”