औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनामुळे वाढलेला मृत्यूदर, प्रशासनाच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीला शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला होते. 80 वयोमान असूनही राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन शरद पवार आढावा घेत आहेत पण मुख्यमंत्री काही बाहेर पडत नाही, या टीकेवर शरद पवार यांनी भाष्य केले.
या बैठकीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या जिल्ह्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेता येणे अवघड होईल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, कोरोनाचे संकट संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन (उद्धव ठाकरे) एका ठिकाणी बसून सगळी टीम काम करते आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवत आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
शरद पवारांचं खाजगी डॉक्टरांना इंजेक्शन; म्हणाले…
…तर आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय…; राजेश टोपेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा
सरकारला देवेंद्र फडणवीस हे संताजी-धनाजीसारखे दिसतात; भाजपचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण