नवी दिल्ली : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये झालेल्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केलं आहे. घटनास्थळी तपासासाठी नेल्यानंतर या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांचां एन्काउंटर केला, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. त्यावर यावर दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आईनं प्रतिक्रीया दिली आहे.
हैदराबादमधील प्रकरणात पीडितेच्या कुटूंबाला दहा दिवसांत न्याय मिळाला आहे. आमच्याप्रमाणे हैदराबादमधील पीडित कुटुंबाच्या वाट्याला संघर्ष आला नाही. या गोष्टीचं समाधान वाटत आहे, अशी प्रतिक्रीया निर्भयाच्या आईनं दिली आहे.
Extremely happy, justice served: Nirbhaya’s mother says after Telangana rape accused killed
Read @ANI Story| https://t.co/tLJmUk80aR pic.twitter.com/bnltowa7Pq
— ANI Digital (@ani_digital) December 6, 2019
27 नोव्हेंबर रोजी रात्री 4 आरोपींनी 25 वर्षांच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांचा खून केला. यानंतर पीडित महिला डॉक्टरांचं मृत शरीरही जाळण्यात आलं. घटनेपूर्वी आरोपींनी काय कट रचला याबद्दल पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे
दरम्यान, या चार आरोपींना 29 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलं होतं. यांनतर आज या आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
ज्या ठिकाणी बलात्कर केला.. त्याच ठीकानी एन्काऊंटर झाला; हैदराबाद प्रकरणी आरोपींचा एन्काउंटर
मुख्यमंत्र्याना ‘हे’ खातं स्वत:कडे ठेवाण्याची इच्छा
“सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत”
शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल- नितीन गडकरी