मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे शपथविधीसाठी नियमावली ठरवून देण्याची मागणी केली असून याबाबतचं त्यांनी पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रमुखांना आपली भूमिका स्पष्ट केली. शपथविधी घेताना आपल्या आराध्य व्यक्तींची नावं जोडून शपथ घेण्याला अटकाव बसावा यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे.
शपथ ग्रहण प्रक्रिये संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचेकडे स्वतंत्र पत्र पाठवून केली आहे, अशा प्रकारचं ट्विट भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे.