मुंबई : सध्या देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात अनेक रुग्णलायं रुग्णांकडून अधिक पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत असल्याचं समोर आलं आहे. यावरुन भाजपा नेते नितेश राणे यांनी करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
निलेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर डॉक्टरांच्या संवादाचा एक व्हिडीओ शेअर करत कोरोना हा महाराष्ट्र शासनासाठी मोठा पैसा मिळवण्याचा व्यवसाय आहे, असं म्हणत नितेश राणेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत
दरम्यान, करोनाच्या नावाखाली धंदा सुरू केला आहे. हा खुप मोठा धंदा आहे. कोविड सेंटरच्या माध्यमातून 25-30 कोटी रूपये खर्चून महानगरपालिकेचा पैसा संपवला आहे. आम्ही, आमचे डीन आम्ही सर्व कोविड फॅसिलिटीमध्ये जातो तेव्हा पाहतो की हे काय चाललंय? हा तर धंदा सुरू आहे. त्या लोकांना करोना संपवायचाच नाहीये. कारण करोना संपवला तर हा धंदा बंद होईल,” असं एक डॉक्टर यात बोलताना दिसत आहे.
This discussion between 2 senior docs from Cooper hospital Mumbai..
reconfirmed what we have been saying over and over again !
Corona is big money making business for Maharashtra Gov!!! pic.twitter.com/XV2EFJlFFG— nitesh rane (@NiteshNRane) July 25, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव”
नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज कुठे गेले?- शरद पवार
…म्हणून मी मंत्रालयात जात नाही- उद्धव ठाकरे
त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने…; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला