मुंबई : कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही, तर डाॅक्टर हाच खरा देव आहे. अशा अंधश्रद्धांपेक्षा शास्त्रावर लक्ष द्यावे. आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं.
धर्मापेक्षा शास्त्र महत्वाचे. कोरोनामुळे धार्मिक सणांना परवानगी नाही. गणपतीबाबतीत देखील मर्यादा पाळाव्या लागतील, असं जयंत पाटील म्हणाले. राम मंदिर होत असेल तर आमचा विरोध नाही. पण कोरोनाच्या संकटात कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, सरकारने कोरोनामुळे लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी धार्मिक सणांना मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज कुठे गेले?- शरद पवार
…म्हणून मी मंत्रालयात जात नाही- उद्धव ठाकरे
त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने…; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
शाळा आता नाही, पण…; मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय