“राणे कुटूंबीय म्हणजे येड्यांची जत्रा झालीये”

0
731

मुंबई : भाजपने काढलेल्या जनआशिर्वाद यात्रेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरूच आहेत. यातच भाजप नेते नितेश राणे यांनी बोलताना शिवसेनेवर निशाणा साधला होता.

सात तारखेचं नेमकं काय झालं हे पहिलं सांगितलं पाहिजे होतं. सात तारखेला मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते येणार होते. काल तारीख अधिकृत जाहीर झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना फोन गेला. मी आधीही म्हटलो होतो, शिवसेना म्हणजे वेड्यांची जत्रा आहे. स्वत:च्या मुख्यमंत्र्यांना वेडं बनवण्याचं काम हे लोक करतायेत, असा घणाघात नितेश राणेंनी केला होता. यावरून आता शिवसेना नेते वैभव नाईक यांनी नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा आरएसएसला शिव्या द्यायचे. भाजपमध्ये गेल्यावर भाजपला शिव्या देण्याचं काम करतायेत. आता मंत्री झाल्यावर शिवसेनेवर टीका करण्याचं काम करतायेत. त्यामुळे राणेंना कुठलीही आयडोलाॅजी राहिली नाही. त्यामुळे राणे कुटुंबीय म्हणजे येड्यांची जत्रा झालीये, असा टोला वैभव नाईक यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच- धनंजय मुंडे

सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही; नवाब मलिक यांचं मोठं विधान

बेळगावात मराठी माणसाचा नव्हे, तर राऊतांच्या अहंकाराचा पराभव- देवेंद्र फडणवीस

राज्यातील आरोग्य केंद्रे बंद करून मंदीरे उघडू का?; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here