Home महाराष्ट्र “महाराष्ट्राला जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेलं राज्य बनविणार”

“महाराष्ट्राला जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेलं राज्य बनविणार”

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात 131 प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून या माध्यमातून महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वोच्च व सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य बनविण्याचे स्वप्न असून ते मी बनवणारच असा ठाम निर्धार व विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो तसेच कोविड सारखी संकटे येतात आणि जातात. या संकटाचा सामना करण्यासाठी तुम्ही सर्वजण पाय रोवून उभे राहिलात त्यासाठी तुम्हाला मन:पूर्वक धन्यवाद देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

उदयनराजेंच म्हणणं बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांवर राजकारण करणं योग्य नाही- जयंत पाटील

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही”

…तो प्रश्न विचारल्यावर संजय राऊत झाले आक्रमक; म्हणाले…

“चीनसोबतचा तणाव वाढत असतानाच शरद पवारांना केंद्रात मोठी जबाबदारी”