‘…हा शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह’; आशिष शेलारांची घणाघाती टीका

0
262

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेने आणि राजशिष्टाचार मंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पायघड्या टाकल्या. त्यांचा दूत म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्यासाठी बैठका अॅरेंज केल्याचाही संशय आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. ते मुंबईत बोलत होते.

तुम्ही देशासमोर खोटे का बोलला, याचे उत्तर द्या. हे कायद्याचे राज्य आहे. कायद्याने चाला. तिन्ही पक्ष एकमेकाशी बोलत नाहीत. हेच यावरून दिसत आहे. राज्यातले मंत्री खोटं का बोलत होते, याचे उत्तर द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी यावेळी केली.

हे ही वाचा : ममता बॅनर्जी म्हणाल्या, यूपीए कुठे अस्तित्वात आहे?; आता संजय राऊत, म्हणतात…

सत्तेतले लोक त्यांचे दूत म्हणून काम करत असल्याचे दिसून येत आहे. जे पराभूत मनोवृत्तीचे आहेत, ते काय ठरवणार, असा सवाल करत ममता बॅनर्जी ऐकत नाहीत. काँग्रेस आहे हे, ते मानत नाही. आणि शरद पवारांचे ऐकत नाहीत. यांचेच एकमेकांचे पाय एकमेकात आहेत, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह आता त्यांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे संजय राऊत पांघरूण घालायचे. हा राजशिष्टाचार ममतांसाठी आहे. तो इतरांसाठी का नाही, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचा भारिपला मोठा खिंडार; भारिपच्या 23 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“काँग्रेसला वगळून पवारांच्या साथीने आघाडी निर्माण करण्याचा ममतादीदींचा प्रयत्न”

आशिष शेलार तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here