मुंबई : खासदारकीची शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिली. यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक नेत्यांकडून व्यंकय्या नायडूंचा निषेध नोंदवला जात आहे. यावर उदयनराजे भोसलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
“उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती”, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
“सभापती व्यंकय्या नायडू यांनी जे राज्यघटनेत नाही त्यावर फक्त आक्षेप घेतला. माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं आहे. महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता. असंही उदयनराजे भोसले म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
दिल्लीत छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, संभाजी भिडे शांत का?; संजय राऊतांचा टोला
तुम्हाला छत्रपती फक्त निवडणुकांपुरतेच हवे असतात; काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याचा भाजपवर टीका
राष्ट्रवादी पाठवणार व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली 20 लाख पत्रं
“शिवछत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आजपर्यंत जनतेची सेवा करत आलोय”