“साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का, की या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही”

0
175

नाशिक : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सरकार आणि संजय राठोड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

मुख्यमंत्र्यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांंचं व्यक्तीमत्व सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. मुख्यमंत्री कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

साहेब हे सर्व एकजात सारखेच आहेत. आम्हाला फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत. तुमच्यावर कोणाचा दबाव तर नाही ना?, असा चित्रा वाघ यांनी यावेळी केला.

साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का ? की या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही. आपण शिवरायांचा महाराष्ट्र म्हणता ना, तर मग तो कृतीतून दाखवायची वेळ आली आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूची चाैथ्या कसोटीतून माघार; BCCI ने दिली माहिती

“ही चित्रा वाघच तुम्हांला पुरुन उरेन”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, पूजा चव्हाण प्रकरणात योग्य निर्णय घेतील”

“राज ठाकरेंनी मास्क नाही घातला आणि कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here