मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गृहखातं स्वत:कडे ठेवायचं आहे आशी माहिती समोर आली आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता समीकरणं बदलली आहेत. बदललेल्या नव्या समीकरणानुसार मुख्यमंत्रिपदासह शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 16 तर काँग्रेसला 13 मंत्रिपद मिळणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी 28 डिसेंबरला शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आठवडा उलटून गेला तरी त्यांना खाती मिळाली नाहीत.
दरम्यान, खातेवाटप अजून झालं नसल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झालेला नाही.
महत्वाच्या घडामोडी –
“सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत”
शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल- नितीन गडकरी
सनातन संस्थेवर बंदी घाला- हुसेन दलवाई
रणवीर सिंहचा नविन सिनेमातील हटके लुक रिलीज