मुंबई : विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोलावलेल्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असा जीआर राज्य सरकारकने काढलेल्या जीआरवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सडकून टीका केली आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी कुठे जाऊ नये आणि माहिती घेऊ नये, असा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकारने या जीआरच्या माध्यमातून केला आहे. पण कोबडं झाकलं तरी सुर्य उगवायचा राहत नाही, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांना अनेक व्यासपीठे आहेत. सरकारच्या विविध व्यासपीठांच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात जाऊन लोकांना न्याय देण्याची भूमिका अधिक आक्रमतेने आम्ही यापुढेही करु, असं प्रविण दरेकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असं भाजपाला वाटतं- सत्यजीत तांबे
कोरोना अपयश लपवण्यासाठी भाजपकडून पायाभरणीचा कार्यक्रम- बाळासाहेब थोरात
“अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या”
अयोध्येला जात असाल तर पेंग्विनसाठी AC ची सोय करून ठेवा, नाहीतर….; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका