मुंबई : कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरुन इतरांचं दुर्लक्ष व्हावं म्हणूनच राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला जातोय. असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर सडकून टीका केली.
“श्रीराम हे दैवत आहेत. पण रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे. आपण जगलो तर रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. आता माणसं जगवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरुन दुर्लक्ष करण्यासाठीच राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला जातोय, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.
दरम्यान, यावेळी बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिर पायाभरणीसाठी जाण्याच्या शक्यतेवरही भाष्य केलं. राम मंदिर हा उद्धव ठाकरे यांच्या श्रद्धेचा विषय आहे, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
दिल्लीत उद्या काय होणार?; शरद पवार राजधानीत मोदींना भेटणार का?
…तर डिसेंबर महिन्यात कोरोनाची लस लोकांना उपलब्ध होऊ शकते; ‘या’ इन्स्टिट्यूटने केला दावा
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला