नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कोणते राजकीय रंग दिसणार याविषयी राजधानीत चर्चा सुरू आहे.
बुधवारी राज्यसभेचे खासदार शपथ घेतील. कोविडच्या पार्श्वभूमीवर किती नवनिर्वाचित खासदार दिल्ली दरबारी पोहोचणार यात शंका आहे, पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातल्या महाआघाडीचे शिल्पकार ठरलेले शरद पवार मात्र आजच संध्याकाळी दिल्लीत पोहोचले आहेत.
शरद पवार यांचा दिल्लीतला कार्यक्रम काय असेल याची अधिकृतरीत्या माहिती देण्यात आलेली नाही. पण ते काही खाजगी भेटीगाठी घेऊ शकतात, असं समजतं. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट पवार घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, बुधवारी सुमारे 43 नवीन राज्यसभा खासदार शपथ घेतील, अशी माहिती आहे. त्याचसाठी शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपचे 18, कॉंग्रेसचे 10 आणि इतर काही पक्षांचे 43 खासदार राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतील. एकूण 61 नवीन खासदारांना शपथ घ्यावी लागणार आहे. पण कोरोनामुळे काही खासदारांना दिल्लीत येता येणार नाही.
महत्वाच्या घडामोडी-
…तर डिसेंबर महिन्यात कोरोनाची लस लोकांना उपलब्ध होऊ शकते; ‘या’ इन्स्टिट्यूटने केला दावा
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
आता तरी जागे व्हा, मोठ्या प्रमाणात चाचण्यांना पर्याय नाहीच; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा