मुंबई : मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते ती त्यांनी मनातून काढून टाकावी. मी ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, ओबीसी समाजाच्या शंका कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी ॲडव्होकेट जनरल यांच्यासमवेत तुमची भेट घडवून आणू, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
आता तरी जागे व्हा, मोठ्या प्रमाणात चाचण्यांना पर्याय नाहीच; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा
करोना चाचण्या कमी केल्यानं आपण काय कमावलं काय गमावलं? फडणवीसांनी दिलं उत्तर
महाविकास आघाडी म्हणजे अमर अकबर अँथनी, ते पायात पाय घालून आपोआप पडतील- रावसाहेब दानवे