Home महाराष्ट्र “सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत”

“सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने  आरे आणि नाणार आंदोलकांवरच्या केसेस मागे घेतल्या आहे. यावर भाजप नेत्यांने जोरदार टीका केली आहे. त्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनील प्रत्युत्तर दिलं आहे

नशीब कसाबला फाशी झाली नाही तर सरकारने त्याच्यावरच्याही केसेस मागे घेतल्या असत्या, असं भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटलं. यावर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत. आपल्या हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी करताना यांना लाजा वाटत नाही का?, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाने या वाचाळवीराच्या नीच वक्तव्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची ताबडतोब माफी मागावी, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल- नितीन गडकरी

सनातन संस्थेवर बंदी घाला- हुसेन दलवाई

रणवीर सिंहचा नविन सिनेमातील हटके लुक रिलीज

jio, Vodafone-Idea, Airtel चा ग्राहकांना फटका; रिचार्ज दर वाढणार!