कोल्हापूर : दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील कोल्हापूरमध्ये शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन केंद्र सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडं घालत अमृतासारखं दूध जमिनीवर ओतून देताना होणारा त्रास समजून घ्या. असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.
“शेतकऱ्यांना प्रतिलीटर दुधाला 30 ते 35 रुपये उत्पादन खर्च येतो. आज पिण्याच्या पाण्यालाही प्रतिलीटर 20 रुपये मिळतात. मात्र, दुधाला 17-18 रुपये दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. त्यामुळे अमृतासारखं दूध जमिनीवर ओतून देताना होणारा त्रास लक्षात घ्या. कर्जबाजारी होऊन मरण येणार असेल, तर सोशल डिस्टन्सिंग कशाला?”असं राजू शेट्टी म्हणाले.
दरम्यान, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला असून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडलं. सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरु महामार्गावरील येल्लूर फाट्याजवळ कार्यकर्त्यांनी गोकूळ दूध संघाचा टँकर फोडला.
महत्वाच्या घडामोडी-
अयोध्येला जात असाल तर पेंग्विनसाठी AC ची सोय करून ठेवा, नाहीतर….; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
दूध दर आंदोलनाला सुरुवात; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फोडला दुधाचा टँकर
.. तर कंगना रानौतने कलाविश्व सोडावं- करण जोहर
राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले…