कोल्हापूर : विद्यापीठांच्या अंतिम परीक्षेच्या निर्णयावरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेवरुन कोणीही राजकारण करु नये. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.
मुलांच्या परीक्षेबाबत पालकांनी चिंता करु नये, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असं उदय सामंतांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राज्य सरकारने आत्ताच्या परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही, असा निर्णय दोन वेळा घेतला आहे. मात्र राज्य सरकारला परीक्षाच घ्यायची नाही हा समज चुकीचा आहे, असंही उदय सामंत यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी-
“कोरोनामुक्त होताच ‘या’ भाजप आमदाराने केली मोठी घोषणा”
शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाचा संसर्ग; कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ
महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज- चंद्रकांत पाटील
“अखेर ठरलं! अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन”