Home महाराष्ट्र शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार समजताच शांत बसले- चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार समजताच शांत बसले- चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात दुधाचे दर घसल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या निशाणा साधलाय.

दुध उत्पादकांसाठी कायदा हातात घेण्याची तयार दर्शवणारे राजू शेट्टी कधी आंदोलन करणार आहेत, हे आम्हाला पाहायचं आहे. शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेणार आज आमदारकी मिळणार असल्याचं समजताच शांत बसले आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यात दुधाला सध्या 22 रुपये इतका दर मिळत आहे. 22 रुपये इतक्या साध्या रकमेतून मुलभूत खर्चही भागवणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे झाले आहे. राज्यात लॉकडाउन होण्याआधी दुधाला साधारण 32 रुपये इतका दर मिळत होता. मात्र तरीही आता कोणीही कुठेही निषेध करताना दिसत नाही. दुधासाठी आंदोलन करणारे राजू शेट्टी आता अगदी शांत आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

या सरकारलाच कोरोना झाला असून…; सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टीका

भगव्याला विरोध करणारे व गुंडाळून ठेवणारे पक्ष सत्तेत तर मग…; भाजपच्या ‘या’ नेत्याची राज्य सरकारवर टीका

भाजपने आमदारांच्या खरेदीऐवजी व्हेंटिलेटर्स खरेदी केले असते तर…; काॅंग्रेसचा भाजपवर निशाणा

अनुसूचित जाती आणि जमातीचे राजकीय आरक्षण रद्द करा- प्रकाश आंबेडकर