मुंबई : लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाल्या असल्याचं सांगत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.
हे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलेलं आहे. या सरकारलाच कोरोना झाला असून सरकारमधील सर्व मंत्री क्वॉरंटाईन झालेत. यांना शेतकऱ्यांचे देणं-घेणं नाही, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
हे सरकार आम्हाला लुटणारचं असेल तर आम्हीच आमचं दूध फुकट द्यायला तयार आहोत. तुम्ही घेऊन जावा. यातून सराकार जागं झालं तर ठिक, नाही जागं झालं तर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल. कारण. शेतकऱ्यांसमोर आता दुसरा पर्याय राहिलेला नाही, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपने आमदारांच्या खरेदीऐवजी व्हेंटिलेटर्स खरेदी केले असते तर…; काॅंग्रेसचा भाजपवर निशाणा
अनुसूचित जाती आणि जमातीचे राजकीय आरक्षण रद्द करा- प्रकाश आंबेडकर
पालघरची घटना केवळ अफवा पसरल्यामुळे घडली- अनिल देशमुख