नवी मुंबई : नवी मुंबईत आयुक्त बदलीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापायला लागलं आहे. नवी मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून तर पहा, असा टोला मनसेनं लगावला आहे. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी चक्क पालकमंत्री बदलीची मागणी केली आहे. आयुक्त बदलून पाहिले, तसेच पालकमंत्री बदलून पाहा, असा टोला गजानन काळे यांनी लगावला आहे.
ठाणे जिल्ह्यातील 4 मनपा आयुक्त बदलले त्याचवेळी नवी मुंबई तत्कालिन आयुक्त मिसाळ यांची पण बदली झाली हाेती मग परत 2 दिवसात बदली रद्द झाली तर आज परत मिसाळ यांची बदली हाेऊन नवीन आयुक्तपदी अभिजित बांगर यांना आणले. सगळे प्रयाेग झाले असतील तर एकदा पालकमंत्री पण बदलून बघा, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अशा प्रकारे गजानन काळे यांनी ट्विट केलं आहे.
ठाणे जिल्ह्यातील 4 मनपा आयुक्त बदलले त्याचवेळी नवी मुंबई तत्कालिन आयुक्त मिसाळ यांची पण बदली झाली हाेती मग परत 2 दिवसात बदली रद्द झाली तर आज परत मिसाळ यांची बदली हाेऊन नवीन आयुक्तपदी अभिजित बांगर यांना आणले.
सगळे प्रयाेग झाले असतील तर
एकदा पालकमंत्री पण बदलून बघा@CMOMaharashtra pic.twitter.com/2k8KBXWUZX— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) July 14, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात भरती करा; देवेंद्र फडणवीसांचा ‘या’ नेत्याला फोन
नया है वह’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले..
निष्णात वकिलांची टीम 27 तारखेलाही असेल; मराठा आरक्षणाची सुनावणी समाधानकारक- अशोक चव्हाण
राजकीय कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमू नका; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र