मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. गणेशोत्सवात अनेक चाकरमान्य कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जातात. मात्र यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी 7 ऑगस्ट मर्यादा ठेवली आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी कोकणात येणाऱ्या भाविकांची राज्य सरकारने ज्या ठिकाणावरुन निघणार त्याच ठिकाणावरुन करोना चाचणी करावी अशी मागणी केली आहे.
चाकरमानी ज्या ठिकाणावरुन कोकणात येण्यासाठी निघणार आहेत, त्याच ठिकाणी त्यांची करोना चाचणी व्हावी. या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास तरच कोकणात प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नितेश राणे यांनी यांनी पत्राद्वारे केली आहे.
जिल्ह्याच्या सीमेवर आपण निगेटीव्ह असल्याचा अहवाल दाखवला तर पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी होईल, आणि भाविकांना क्वारंटाइन करण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची सरकारने मोफत करोना चाचणी करावी, असंही नितेश राणे म्हणाले.
Every1 who is coming to Sindhudurg for Ganesh Chaturthi shud get their Covid test done n show Covid report at the entry point n enter sindhdurg .this shud be done within 48 hrs.Maha Gov shud ensure all the reports r done for free.This will avoid all confusion n avoid the mess! pic.twitter.com/STsHQFAytC
— nitesh rane (@NiteshNRane) July 14, 2020
महत्वाच्या घडामोडी-
बारामतीकरांसाठी शरद पवार ठरले देवदूत; कोरोना रुग्णांसाठी केली ‘ही’ मोठी मदत
जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार?; मुख्यमंत्री म्हणतात…
अजित पवारांच्या ‘बारामती पॅटर्न’ ला तडा; उद्या मध्यरात्रीपासून कडकडीत लॉकडाऊन