बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरात लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आली आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीकरांसाठी मोठं योगदान दिलं आहे.
संपुर्ण जगभरात कोरोनाग्रस्तांना उपयुक्त असलेली रेमीडेसेव्हर या औषधाची 100 इंजेक्शन्स शरद पवार यांनी आज बारामती मेडिकल कॉलेजच्या स्वाधीन केली. आता गरजू रुग्णांसाठी ती वापरण्यात येणार आहे.
दरम्यान, बारामती येथील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांच्याकडे आज त्यांनी ही इंजेक्शन्स सुपूर्द केली. बारामतीकरांच्या दृष्टीने ही इंजेक्शन्स महत्वाची ठरणार असून ज्यांना आवश्यकता असेल त्यांच्यासाठी या इंजेक्शन्सचा वापर करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार?; मुख्यमंत्री म्हणतात…
अजित पवारांच्या ‘बारामती पॅटर्न’ ला तडा; उद्या मध्यरात्रीपासून कडकडीत लॉकडाऊन
देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी आणि छापण्याची हिंमत दाखवावी- संजय राऊत