Home पुणे अजित पवारांच्या ‘बारामती पॅटर्न’ ला तडा; उद्या मध्यरात्रीपासून कडकडीत लॉकडाऊन

अजित पवारांच्या ‘बारामती पॅटर्न’ ला तडा; उद्या मध्यरात्रीपासून कडकडीत लॉकडाऊन

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘बारामती पॅटर्न’ला तडा गेली आहे. कोरोनामुक्त झालेल्या बारामती शहरात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

धक्कादायक म्हणजे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या प्रतिष्ठीत नागरिकालाच कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी बारामती शहरात उद्या (बुधवार) मध्यरात्रीपासून कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पुढील आदेश मिळेपर्यत शहरात लॉकडाऊन असणार आहे.

बारामती शहरात गेल्या तीन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची सध्या 63 वर पोहोचली आहे. ज्येष्ठ नगरसेवकाचा मुलगा,वकिलांची पत्नी आणि एका नामाकिंत बॅंकेचे अध्यक्षांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात सध्या 32 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे शहरातील काही लोक पुणे, मुंबई असा प्रवास करून आले. त्यामुळे कोरोनामुक्त शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

चार महिन्यात सर्व सण साधेपणाने झाले, बकरी ईदही साधेपणाने करु, पुढच्या वर्षी जल्लोष करु; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी आणि छापण्याची हिंमत दाखवावी- संजय राऊत

…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका

पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर; काय सुरु काय बंद?