कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सामनातील मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्या निवडणुकीतील निकालाच्या वक्तव्यांवर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर त्यांच्या राज्यात राष्ट्रवादीला 20 आणि काँग्रेसला 10 जागाच आल्या असत्या, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी निवडणुका लागतील तेव्हा चारही पक्षांनी स्वतंत्र लढून आपला जनाधार दाखवून देऊ, असं आव्हानही चंद्रकांत पाटलांनी पवारांना दिलं.
शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदार कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनाला हे सरकार 5 वर्षे टिकणार आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. संजय राऊत सरकार पाडून दाखवा असं म्हणत आहेत, पण सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, पुढील निवडणुकीत चारही प्रमुख पक्षांनी वेगवेगळं लढायचं असं ठरवू आणि लढून बघू. या येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढल्यावर चारही पक्षांपैकी कुणाला किती बेस किती आहे हे बघू, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर; काय सुरु काय बंद?
देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांच प्रत्यृत्तर; म्हणाले…
“महाराष्ट्रात दिलदार मुख्यमंत्री; फडणवीसांना सत्ता गेल्याचं सहन होईना”
“हा घ्या; संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा पुरावा’”