मुंबई : राजस्थानातील राजकीय अस्थिरतेवर आता महाराष्ट्रातील नेतेमंडळीही आपली प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. यावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपला घोडेबाजाराची सवय आहे, त्यांना पैशाचा उन्मात आहे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच, राज्यात दिलदार मुख्यमंत्री आणि शरद पवार, सोनिया गांधी असल्याने राज्यातील सरकार स्थिर असल्याचंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आदरणीय देवेंद्र फडणवीस आमच्या विदर्भातील आहेत. मात्र, त्यांना सत्ता नसलेलं सहन होत नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर केली.
महत्वाच्या घडामोडी-
“हा घ्या; संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा पुरावा’”
चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी; अन्यथा…; हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना इशारा
मंत्री झाल्याने शहाणपण येत नाही; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
सरकार पाडण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही; फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल