Home महाराष्ट्र “बिग बी आणि अभिषेक बच्चननंतर ऐश्वर्या-आराध्या यांनाही कोरोनाचा संसर्ग”

“बिग बी आणि अभिषेक बच्चननंतर ऐश्वर्या-आराध्या यांनाही कोरोनाचा संसर्ग”

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली असतानाच आता ऐश्वर्या राय बच्चन हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अभिषेक-ऐश्वर्या यांची कन्या आराध्या बच्चन हिलाही संसर्ग झाला आहे. या दोघींनाही नानावटी रुग्णालयात नेले जाण्याची शक्यता आहे.

बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आता समोर आला असून ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, बिग बी यांच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मोदी तुम्हाला गुरु मानतात; यावर शरद पवार म्हणाले…

अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; पालिकेने केला बंगला सील

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नंतर अभिषेकसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह

अमिताभ बच्चन यांना कोरोना; नानावटी रुग्णालयात केलं दाखल