Home महाराष्ट्र धारावीनं करून दाखवलं… जागतिक आरोग्य संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच कौतुक

धारावीनं करून दाखवलं… जागतिक आरोग्य संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच कौतुक

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीनं कोरोनाविरोधातील लढा यशस्वी केला. यावर जागतिक आरोग्य संघटनेकडून याची दखल घेण्यात आली आहे. WHO कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र आले असून या पत्रात ठाकरेंचं कौतुक करण्यात आल आहे.

कोरोनाचं संक्रमण वेगानं झाल्यावर सरकारनं त्यावर नियंत्रण मिळवल्याचं धारावी हे उत्तम उदाहरण आहे, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील धारावी परिसरात करोना चाचणी, रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंग आणि संसर्ग झालेल्या रुग्णांवर त्वरित उपचार केल्यामुळे करोनाविरोधातील लढाईत यश मिळताना दिसत आहे. काही देशांमध्ये आता निर्बंध कमी करण्यात येत आहेत. अशा ठिकाणी पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता आवश्यक आहे,” असं गेब्रेयेसुस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

105 जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही?; यावर शरद पवार म्हणाले…

…म्हणून ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा चेष्टेचा विषय झाला- शरद पवार

“मुख्यमंत्र्यांचं ‘हे’ काम पाहून देवेंद्र फडणवीसांचे डोळे पांढरे होतील”

मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी- अशोक चव्हाण