Home महाराष्ट्र “मुख्यमंत्र्यांचं ‘हे’ काम पाहून देवेंद्र फडणवीसांचे डोळे पांढरे होतील”

“मुख्यमंत्र्यांचं ‘हे’ काम पाहून देवेंद्र फडणवीसांचे डोळे पांढरे होतील”

मुंबई : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील सर्वात मोठी व्यवस्था मुंबई मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अल्पकाळात उभारली गेली आहे. मुख्यमंत्र्यांचं हे काम पाहून देवेंद्र फडणवीसांचे डोळे पांढरे होतील, असा टोला ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांना लगावला आहे.

राज्यात दौरे करत फिरणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे काम एकदा डोळ्याखालून घालावं. राज्यात केलेलं हे काम बघून फडणवीस यांचे डोळे पांढरे होतील, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी कोरोना निवरणाबाबत चर्चा केली असता त्यांनी ऑगस्ट पर्यंत लस संशोधन होइपर्यंत मुंबईतील संसर्ग आटोक्यात आणण्याची ग्वाही दिली आहे, असंही मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी- अशोक चव्हाण

एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद; नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर; मुख्यमंत्र्यांसोबत ‘या’ 3 मुद्द्यांवर चर्चा

एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं; त्यामुळे तुमचा अभ्यास पक्का करा- संजय राऊत