मुंबई : मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी आहे, असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
मराठा आरक्षण उपसमितीची आज (10 जुलै) संध्याकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीत अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेतलं जाईल, असं आश्वासन अशोक चव्हाण यांनी यावेळी दिलं.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या तयारीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. पण विधीमंडळाने सर्व सहमतीने पारित केलेले मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद; नारायण राणेंचा शिवसेनेला टोला
प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर; मुख्यमंत्र्यांसोबत ‘या’ 3 मुद्द्यांवर चर्चा
एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं; त्यामुळे तुमचा अभ्यास पक्का करा- संजय राऊत
सांगलीत राष्ट्रवादीच्या ‘या’ कार्यकर्त्याची हत्या