सांगली : सांगलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची निर्घूण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे कुपवाड शहर उपाध्यक्ष आणि लेबर काँट्रॅक्टर दत्तात्रय पाटोळे यांची पाठलाग करुन धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शुक्रवारी भरदुपारी घडलेल्या या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे.
दत्तात्रय पाटोळे शुक्रवारी दुपारी दुचाकीवरुन कुपवाडहून सांगली शहराकडे निघाले होते. दुपारी एकच्या सुमारास मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये रोहिणी कोल्ड स्टोअरेजजवळ त्यांना तिघांनी अडवले. दुचाकी थांबताच हल्लेखोरांनी चाकू, चॉपर आणि कोयत्याने पाटोळे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, पाटोळे जीव वाचवण्यासाठी जवळच्याच रोहिणी कोल्ड स्टोअरेजच्या दिशेने पळाले. मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करुन त्यांना गाठले. त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार करुन हल्लेखोर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर…- नारायण राणे
मराठा समाजात एकी हवी; विजय आपलाच- छत्रपती संभाजीराजे
महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना दिलासा; कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह
शब्दच्छल करणाऱ्यांना शरद पवारांनी गारद केलेय, त्यामुळे…; छगन भुजबळांचं फडणवीसांना उत्तर