मुंबई : सारथी संस्थेच्या बैठकीनंतर अजित पवारांनी सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. या बैठकीनंतर अवघ्या 2 तासात सारथी संस्थेला 8 कोटी रुपये देण्याचं सरकारी परिपत्रक जारी करण्यात आलं. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सारथी! दोन तासात 8 कोटी रुपयाचा निधी मिळवता आला. सर्व मागण्या मान्य करुन घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. समाजात एकी असली की सर्व काही करुन घेता येतं. स्वायत्त आणि सक्षम सारथी गरीब मराठा समाजातील गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अशा प्रकारे छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत समाधान व्यक्त केलं आहे.
सारथी! दोन तासात 8 कोटी रुपयाचा निधी मिळवता आला. सर्व मागण्या मान्य करून घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. समाजात एकी असली की सर्व काही करून घेता येतं. स्वायत्त आणि सक्षम सारथी गरीब मराठा समाजातील गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल. pic.twitter.com/Bn7VJQMwcw
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 9, 2020
महत्वाच्या घडामोडी-
महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना दिलासा; कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह
शब्दच्छल करणाऱ्यांना शरद पवारांनी गारद केलेय, त्यामुळे…; छगन भुजबळांचं फडणवीसांना उत्तर
सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ; संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय