मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेवर मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
हा आमच्या प्रज्ञास्थळावर हल्ला… हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला… ह्या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे, असं ट्वीट करत सरकारने आणि मराठी समाजाने अशा समाजविषाणूंना समूळ नष्ट करण्यासाठी आता कृतिशील व्हावं, असं आवाहन मनसे केलं आहे.
दरम्यान, आज मंत्रिमंडळात बैठकीत राजगृहावरच्या हल्ल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय़ घेण्यात आला आहे. इथून पुढे आता राजगृहाला 24 तास पोलिसांचा पहारा असेल, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
हा आमच्या प्रज्ञास्थळावर हल्ला… हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला… ह्या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच पण सरकारने आणि मराठी समाजाने अशा समाजविषाणूंना समूळ नष्ट करण्यासाठी आता कृतिशील व्हावं. #राजगृह #प्रज्ञासुर्य #महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/obw1FsgUPH
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…तर दीर्घकाळासाठी जगाला परिणाम भोगावे लागतील; चीनची धमकी
“आपल्याच भावाचे 7 नगरसेवक फोडणाऱ्यांना या 5 जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का?”
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार; घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
राजगृह निवासस्थान तोडफोडप्रकरणी रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…