Home देश केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार; घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार; घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रिय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत स्थलांतरित मजूर, सर्वसामान्य नागरिक ते विमा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयांबाबत माहिती दिली.

उद्योगधंद्यांना दिलासा

ज्या कंपनीत 100 पेक्षाही कमी कर्मचारी आहेत आणि 90 टक्के कर्मचाऱ्यांचा पगार 15 हजारापेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांचा कंपनीकडून 12 टक्के पीएफ दिलं जातं. मात्र, या कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांचे पीएफ भरणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील 3 लाख 66 हजार कंपन्यांना फायदा होणार आहे, असं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.

सरकार स्थलांतरित मजुरांना भाड्याने घर देणार

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत 107 शहरांमध्ये 1 लाख 8 हजार लहान घरं तयार आहेत. स्थलांतरित मजुरांना राहण्यासाठी घरं मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरं स्थलांतरित मजुरांना भाडे तत्वावर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.

विमा कंपन्यांमध्ये गुंतवणूक

देशातील तीन विमा कंपन्यांमध्ये सरकार 12 हजार 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहितीदेखील प्रकाश जावडेकर यांनी दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी महत्वाचे निर्णय

1) कृषी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांचा अ‍ॅग्री इन्फ्रा फंड मंजूर
2) गरीब कल्याण अन्न योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यास सहमती
3) व्यापारी आणि कर्मचार्‍यांच्या हितासाठी 24 टक्के ईपीएफ सहाय्य मंजूर
4) उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी सिलिंडर वितरण करण्याच्या योजनेस मान्यता

महत्वाच्या घडामोडी-

राजगृह निवासस्थान तोडफोडप्रकरणी रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

दोन करोना पॉझिटिव्ह नेत्यांच्या संपर्कात आल्यामुळे अमोल कोल्हे क्वारंटाइन

“राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही”

सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवारांच्या बाजूने कधी राज्यपालांच्या- देवेंद्र फडणवीस