मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत. या हल्ल्याची सीआयडी द्वारे चौकशी करावी या मागणीबाबतचे पत्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे.
दरम्यान, अशा प्रकारे रामदास आठवले यांनी ट्विट करत आरोपींचा तीव्र निषेध केला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत.या हल्ल्याची सीआयडी द्वारे चौकशी करावी या मागणीबाबतचे पत्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) July 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
दोन करोना पॉझिटिव्ह नेत्यांच्या संपर्कात आल्यामुळे अमोल कोल्हे क्वारंटाइन
“राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही”
सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवारांच्या बाजूने कधी राज्यपालांच्या- देवेंद्र फडणवीस
राजगृह निवासस्थान तोडफोडप्रकरणी प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; केलं शांततेचं आवाहन