Home महाराष्ट्र सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवारांच्या बाजूने कधी राज्यपालांच्या- देवेंद्र फडणवीस

सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवारांच्या बाजूने कधी राज्यपालांच्या- देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘सामना’इतका अंतर्विरोध कुठेच पाहिला नाही. सामनाची भूमिका रोज बदलते, असं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सामनावर निशाणा साधला आहे. ते टीव्ही9 मराठी’शी बोलत होते.

सामना’ची भूमिका रोज बदलते, ती कधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात असते, कधी बाजूने असते. कधी राज्यपालांच्या बाजूने असते, तर कधी विरोधात असते. त्यांना स्वतःचा बेसच नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या ‘सामना’ची काय अवस्था आहे. भूमिका नसलेला सामना, लांगुलचालन करणारा सामना, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दरम्यान, त्यांना काय करायचे ते लख लाभ, आम्ही आमचं काम करत राहू. आम्हाला सरकार पाडायची घाई नाही. आम्ही तसा प्रयत्नही करणार नाही. त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी पाच वर्ष सरकार चालवावे” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राजगृह निवासस्थान तोडफोडप्रकरणी प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; केलं शांततेचं आवाहन

अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजे भोसले यांना फोन; केली ‘ही’ महत्वाची विनंती

राजगृह तोडफोड प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी केली मागणी पोलीस आयुक्तांकडे ‘ही’ महत्वाची मागणी

एक शरद… सगळे गारद!; संजय राऊतांनी प्रसिद्ध केला मुलाखतीचा टिझर