मुंबई : मागील काही दिवसांपासून गैरव्यवहाराच्या आरोपांसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात सारथी संस्था चर्चेत आहे. सारथीवरून विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. सारथी संदर्भातील वाद वाढ असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केला आहे.
सारथी संबंधित मुद्यांवर उद्या बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांना अजित पवारांनी फोन केला असून, या बैठकीला हजर राहण्याची विनंती केली आहे.
सारथी संस्थेवरून राज्यात नव्या वादानं डोकं वर काढलं आहे. सारथीवरून सुरू असलेल्या वादासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सारथीचा प्रश्न सातत्यानं मांडत असलेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांना हजर राहण्याची विनंती अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
सारथी संदर्भात उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक pic.twitter.com/06wIIHFhBQ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
राजगृह तोडफोड प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी केली मागणी पोलीस आयुक्तांकडे ‘ही’ महत्वाची मागणी
एक शरद… सगळे गारद!; संजय राऊतांनी प्रसिद्ध केला मुलाखतीचा टिझर
“राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी”
“…तरीही सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत”