मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
“राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावरील तोडफोडीच्या घटनेचा निषेध केला आहे.
राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असुन गृहमंत्र्यांना विनंती सखोल चौकशी होवुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे.
बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.
आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असुन गृहमंत्र्यांना विनंती
सखोल चौकशी होवुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी @AnilDeshmukhNCP— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 7, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“…तरीही सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड
मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक
‘हा’ महाविकास आघाडीतील अंतर्गत प्रश्न; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य