Home महाराष्ट्र “…तरीही सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत”

“…तरीही सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत”

मुंबई : गेले काही दिवस सरकारमध्ये अंतर्गत विरोध असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारमध्ये कोणताही अंतर्गत विरोध नसल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. यावरून आता शिवसेनेनंदेखील भाजपवर निशाणा साधला आहे.

चिनी सैन्यानं गलवान खोऱ्यातून माघार घेतली पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर निशाणा साधला.

सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँगेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, ‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत. शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का?, असा सवालही शिवसेनेने यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक

‘हा’ महाविकास आघाडीतील अंतर्गत प्रश्न; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

मातोश्रीवर जाण्यात कमीपणा काय?; शरद पवारांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर