Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही- रोहित पवार

देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही- रोहित पवार

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं बोललं जातंय. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार अंतर्गत वादातून पडणार असल्याचा दावा केला. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपच सोशल मीडियाच्या माध्यमातून दुफळीचं चित्र दाखवत आहे. मात्र अशी कोणतीही गोष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांना वाटतं तशी परिस्थिती नाही, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. ते कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाणी प्रश्नासंदर्भात सिंचन भवन येथे आले होते. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. फडणवीसांच्या मनात कुठंतरी काही तरी व्हावं हेच आहे. मात्र सरकारमध्ये संवाद आणि चर्चा होत आहे. एक हाती कारभार आमच्यात नाही. आम्ही चर्चा करुन अनुभवाचा फायदा घेऊन लोकहिताचे निर्णय घेतो, असं रोहीत पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन”

…मग मुख्यमंत्री घरीच का?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हे सरकार नाही सर्कस आहे; नितेश राणेंचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र

‘देऊळ बंद 2…आता परीक्षा देवाची’; प्रवीण तरडेंनी केली देऊळ बंद चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा