मुंबई : जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे, असं म्हणत भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, सामान्य माणसाची कुणाला चिंता नाही. बदल्या कोण करतंय कळत नाही, ताळमेळ नाही, काय चाललंय काही समजत नाही, असं नारायण राणे म्हणाले.
हा मुख्यमंत्री निष्क्रीय आहे. हा प्रशासन चालवू शकत नाही. जनतेची परिस्थिती थांबवू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे सरकार घातक आहे. महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू होत आहे. त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही. त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती, असंही राणेंनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी-
महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे- देवेंद्र फडणवीस
वाट्टेल ती किंमत मोजून सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण…- संजय राऊत
निर्मला सीतारमण यांची काळ्या नागिणीशी तुलना; ‘या’ नेत्याची जीभ घसरली
“पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण”