मुंबई : ऑक्टोबरपर्यंत वाट्टेल ती किंमत मोजून सरकार पाडण्याच्या पैजा लागल्या आहेत, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे, असं असा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून केला आहे.
ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर अशा पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्राचे सध्याचे सरकार पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. नंतर येणारे सरकार नामनियुक्त 12 जणांच्या नेमणुका करेल, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, या राजकारणात राज्यपाल नावाची घटनात्मक संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे, असं म्हणत राऊतांनी राज्यपालांवर निशाणा साधला.
महत्वाच्या घडामोडी-
निर्मला सीतारमण यांची काळ्या नागिणीशी तुलना; ‘या’ नेत्याची जीभ घसरली
“पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण”
शरद पवार यांच्या सूचनांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठरवावं- देवेंद्र फडणवीस
“तीन पक्षाचं सरकार… सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाड”