“राडा करणाऱ्यांना काल शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन देण्याची वेळ आणू नका”

0
389

मुंबई : राम मंदीराच्या मुद्दयावरून मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात पुकारलेल्या मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

भाजपचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. तिथं त्यांनी राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी भाजपला दिला.

शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. हुतात्मा चौक जसं आपल्या अस्मितेचं प्रतिक आहे. मराठी माणसाचं केंद्रबिंदू आहे. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण तसंच शिवसेना भवन मराठी माणसाच्या अस्मितेचं भवन आहे. ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय? तुम्हाला लिहिता वाचता येतं का? तुमचा शिक्षणाशी काही गंध आहे का? असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपवर केला.

महत्वाच्या घडामोडी –

“एकटा संभाजी काय करणार?; त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी”

भाजप कार्यकर्त्यावर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा

शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार- किशोरी पेडणेकर

बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचे कारण सांगून…; प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here