Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी केली नितेश राणेंची ‘ती’ मागणी मान्य

उद्धव ठाकरेंनी केली नितेश राणेंची ‘ती’ मागणी मान्य

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरे जंगल तोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला. आरे नंतर आता नाणारबाबतही त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. आरेच्या आंदोलकांचे गुन्हे मागे घेतल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी नाणारमधील गुन्हे मागे घेण्याची मागणी ट्वीटवरुन केली होती.

आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेतले. आता नाणार आंदोलनातील गुन्हे देखील मागे घ्यावेत. ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं होतं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आधीच राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेत असल्याचं सांगत श्वेतपत्रिका काढण्याचे संकेत दिले आहेत.