Home मनोरंजन बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का; प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान काळाच्या पडद्याआड

बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का; प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान काळाच्या पडद्याआड

मुंबई :  सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं कार्डिअ‌ॅक अरेस्टमुळे शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्या 71 वर्षांच्या होत्या. 17 जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सरोज यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली होती. पण ही चाचणी निगेटिव्ह आली होती.

दरम्यान, सरोज खान यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. त्यांनी आतापर्यंत 2 हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत सरोज खान यांनी बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय अभिनेत्यांना नृत्य शिकवलं होतं.

फिल्मफेअरमध्ये 1988 पर्यंत कोरिओग्राफीसाठी स्वतंत्र त्यांना अवॉर्डच नव्हता मिळाला नव्हता. तेजाब मधल्या ‘ एक दो तीन’ या गाण्याच्या सरोज खान यांच्या कोरियोग्राफीला सन्मानित करण्यासाठी सुरु अवॉर्ड करावा लागला.

दरम्यान, सरोज खान यांनी कलंक या चित्रपटातील तबाह हो गए हे शेवटचं गाणं कोरिओग्राफ केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला तरी…; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा

चौथीची पोरगी पण सांगेल की ठाकरे सरकारचं काही खरं नाही; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

“जातो माघारी पंढरीनाथा; तुझे दर्शन झाले आता”

हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली- अतुल भातखळकर