बलात्कार करणाऱ्या लोकांना हे सरकार पाठीशी घालतंय- नारायण राणे

0
155

मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत वनमंत्री संजय राठोड आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

कोण आला रे कोण आला वंजाऱ्यांचा वाघ आला. पूजा चव्हाण यांचा मृत्यू आत्महत्येने झाला की त्यांचा खून झाला हे समोर आलेलं नाही. पण राठोड आणि पूजा यांच्या 11 व्हिडीओ क्लिप समोर आल्या आहेत. या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेतलं जात होतं. ते पंधरा दिवसांपासून फरार होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. ते संत आहेत का? मंदिरात जायला? ज्याच्यावर आरोप आहेत. आरोपाला सामोरे जा. पळताय कशाला? असे अनेक प्रश्न नारायण राणे यांनी यावेळी केले.

दरम्यान, क्लिपचा आवाज खराय की खोटाय हे आधी सरकारने आम्हाला सांगावं. सरकार विनयभंग, बलात्कार, खून करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतं. सरकार सुशांत सिंग, दिशा सालियान, पूजा केस या सर्व केसमध्ये आरोपींना पाठिशी घालतंय. या सरकारला लायसन्स दिलंय का? असा सवाल राणेंनी यावेळी सरकारला केला.

महत्वाच्या घडामोडी –

कुलू, मनालीला जायाचं?; पूजा चव्हाण-गबरुशेठ मधील नवीन ऑडिओ क्लिप समोर आल्यानं खळबळ

“मेहबूब शेख, धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्यावरील कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे”

स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?- निलेश राणेंचा सवाल

सांगली महापौर निवडणूक! पराभव भाजपच्या जिव्हारी, ‘त्या’ फुटलेल्या नगरसेवकांवर करणार कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here