मुंबई : सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ सुरु आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची बाब समोर येत आहे. यावर ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्या वतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असं असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची? आदित्य ठाकरेंचा प्रकाश जावडेकरांना प्रश्न
…तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार; हसन मुश्रिफ यांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान
सामना’च्या अग्रलेखाला विखे पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…