Home महाराष्ट्र धनंजय मुंडेंची कोरोनावर मात; हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात; हात जोडून डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

धनंजय मुंडे यांना अकरा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची दुसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली. त्यामुळे आता केवळ एक अंगरक्षक आणि एक कुक असे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसैनिकांची पत्रं ‘प्रहार’मधून छापतो, मग बघू कशी कुरकुर होते; नितेश राणेंचा राऊतांना निशाणा

लातों के माफिया बातों से नाही मानते; सोनू निगमचा ‘या’ संगीतकारांना इशारा

“अमित ठाकरे राजभवनात; निवासी डॉक्टरांच्या परीक्षांबाबत राज्यपालांशी चर्चा”

आशा सेविकांसाठी अमित ठाकरेंची अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी