Home महाराष्ट्र चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर….; रामदास आठवलेंचा इशारा

चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर….; रामदास आठवलेंचा इशारा

मुंबई : चिनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. यावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे.

चीन हा एक कपट करणारा देश आहे. भारताने सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे.भारतातील चायनीज फूडवर बंदी आणली पाहिजेत, असं रामदास आठवले म्हणाले.

जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांचा धम्म भारतातुन चीनमध्ये आणि सर्व जगात प्रसारित झाला आहे. त्यामुळे भारताने चीनला बुद्ध दिला असून युद्ध दिलेले नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू, असा इशारा रामदास आठवलेंनी दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे आहेत- सयाजी शिंदे

हे सरकार जातीयवादी तर आहेच मात्र…; प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारवर टीका

शिवसेनेचा त्याग खूप मोठा आहे; सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला

जे काही झालं त्यासाठी करण जोहरवर आरोप करणं म्हणजे…;राम गोपाल वर्माचा करण जोहरला पाठिंबा